marathasamaj
वधु - वर सुचक केंद्र मराठा वधु-वर वेबसाईटला जाण्यासाठी येथे क्लीक करा
 • मराठा समाजामधील तरुण-तरुणींचे विवाह जमविणे हा अलीकडे अनेक पालकांना फार मोठा अवघड प्रश्न निर्माण झालेला दिसत आहे. त्यामुळे अनेक तरुण-तरुणींचे विवाह योग्य वेळी व योग्य वयात होत नाहीत. तसेच याचाच फायदा घेऊन अनेक खाजगी व्यावसायिक अशा पालकांची आर्थिक पिळवणूक व प्रसंगी फसवणूकही करतात असे अनेकांच्या अनुभवाला आले आहे. या सर्वाचाविचार करुन संस्थेने गेली सुमारे 15 वर्षांपासून एक वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये आम्ही वधू-वर सूचक विभाग स्थापन केला आहे. याद्वारे प्रत्येक दिवशी वधू-वरांच्या नवीन नोंदी करून त्याचे विश्लेषण करुन वेगवेगळ्या गटांमध्ये विभागणी करून त्याच्या तशा अलग अलग फाईल्स् तयार करुन त्यातील स्थळांची माहीती नोंदणीकृत व्यक्तींना उपलब्ध करुन दिली जाते.
 • संस्थेचे हे कार्य कसलीही साप्ताहीक सुट्टी न घेता अविरत चालू असते. याखेरीज यामध्ये संस्थेने एक आणखी वेगळा उपक्रम चालू केला आहे. त्यानुसार वेळोवेळी आम्ही वधू-वरांचा प्रत्यक्ष परिचय मेळावा आयोजित करतो. त्यामध्ये उमेदवार स्वतः स्टेजवरुन स्वतःची माहीती देऊन आपल्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा व्यक्त करतात. त्यावेळी इतर अन्य अनेक उमेदवार व त्यांचे पालक समक्ष हजर असल्यामुळे त्याठीकाणी वधू-वरांची निवड करणे सुलभ जाते. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात प्रत्यक्ष चर्चा करुन विवाह जमविण्याच्या दृष्टीने प्रयत्न होतात.
 • मराठा समाजामधील तरुण विधवा, विधुर, अपंग आणि दुर्दैवाने घटस्फोट घेतलेले तरुण-तरुणी यांचे विवाह हा एक समाजापुढील गंभीर प्रश्न असून अशा विवाहांना संमती व मान्यता देण्यास समाज अजूनही मनापासून तयार होत नाही. म्हणून आमच्या संस्थेने केवळ अशाच व्यक्तींच्यासाठी वेगळे परिचय मेळावे आयोजित केलेले आहेत आणि त्यांच्या नोंदीही वेगळ्या प्रकारे केल्या जातात. याशिवाय अशा व्यक्तींसाठी संस्थेने समाजाजी मानसिकता बदलण्याचे प्रयत्न केले आहेत. असे विवाह घडवून आणण्यासाठी संस्थेचे सभासद खास प्रयत्न करीत असतात. आमचा हा हळूहळू यशस्वी होणारा उपक्रम पाहून समाजातील अन्य घटकांनीसुध्दा याप्रकारे प्रयत्न चालू केले आहेत.
 • वधू-वर परीचय मेळावा :
  समाजातील इच्छुक वधू-वरांना समक्ष बोलावून त्यांना स्वतः उपस्थितांना त्यांचा परीचय करुन देण्यासाठी 10 ते १२ मेळावे दरवर्षी घेते. त्यास उत्तम प्रतिसाद मिळतो आणि दरवर्षी सुमारे ५० विवाह जमविण्यास संस्था यशस्वी झाली आहे.
 • विवाहमूहूर्त :
  पंचांगातील रुढ मूहूर्ताच्या बेड्या बहुजन समाजाने तोडाव्यात म्हणून रुढ विवाहाखेरीज अन्य दिवशी विवाहादि मंगलकार्य करण्यासाठी सांस्कृतिक भवनाच्या भाडे आकारणीत शेकडा २५ टक्के सवलत देण्याची अभिनव योजना सुरु करुन ती लोकप्रिय केली आहे आणि अशी योजना अन्यत्र कोणीही राबवत नाही.
 • सामुदायिक विवाह सोहळा :
  संस्था समाजातील गोरगरीब गरजू लोकांकरीता सामुदायिक विवाह सोहळा वेळोवेळी यशस्वी करण्याचे प्रयत्न करते.
 • अक्षता :
  विवाह समारंभास वधु-वरांवर उधळल्या जाणाऱ्या अक्षतांच्या रुपाने बहुमोल धान्याची होणारी नासाडी टाळण्यासाठी वधु-वरांवर फुले उधळण्याच्या पध्दतीचा संस्थेने प्रयत्न चालविला आहे.
िि


िि


िि


िि

िि


िि
   
© 2011-12 Maratha Samaj Sangli Site Designed By : InfoSavant Technologies Ltd